नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पात काय असावे यासाठी सूचना पाठविता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाने या संबंधात जारी केलेल्या माहितीनुसार नागरिकांना आपल्या सूचना मायगोव्हडॉटइन या पोर्टलवर 20 जूनपर्यंत पाठविता येऊ शकणार आहेत.
अर्थमंत्रालयाने उद्योजकांच्या विविध संघटनाबरोबर चर्चा केली आहे. तसेच त्यांच्याकडून निवेदने आलेली आहेत. ही प्रक्रिया काही दिवस चालणार आहे. उद्योजकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकाला आपली सूचना संबंधित पोर्टलवर पाठविता येऊ शकेल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांतील उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.