नवी दिल्ली – अल्प बचतीच्या माध्यमातून बचत करण्यात पश्चिम बंगालचे नागरिक आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 2017 -18 या वर्षात अल्पबचतीच्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपयाचे संकलन झाले. अल्पबचतीमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशात या वर्षात एकूण 70 हजार कोटी रुपये जमा झाले. 2017-18 मध्ये 5.96 लाख कोटी रुपये जमा झाले. अल्पबचतीवरील व्याजदर सरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी जाहीर करीत असते. सध्या इतर क्षेत्रातील व्याजदर बरेच कमी आहेत. त्यामुळे अल्पावधीतवरील व्याजदर आगामी काळात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.