परिवहन आयुक्‍तांमुळे नागरिकांचा खोळंबा

पुणे –  परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी पुणे परिवहन कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. पण आलेल्या नागरिकांना पूर्वसूचना न देता येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चन्ने यांच्या बैठकीला जावे लागले. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत चन्ने यांनी अधिकाऱ्यांना मार्गर्दशन केले. परिवहन विभागाकडून सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, याची काळजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कर भरणा, परवाना नूतनीकरण, विमा काढणे आदी कामांसाठी दररोज हजारो नागरिक आरटीओमध्ये येतात. सकाळी अकराच्या दरम्यान आलेल्या नागरिकांना मात्र कर्मचाऱ्यांची वाट पाहत रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

पूर्वी आयुक्तांची मुंबई येथे आढावा बैठक होत होती. आता आयुक्त प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन देखील बैठक घेत आहेत. त्यानुसार चन्ने यांनी दि.4 रोजी सकाळी 8 च्या सुमारास पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दैनंदिन कामाची पाहणी केली. यानंतर झालेल्या बैठकीमध्ये चन्ने यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पण, यामुळे नागरिक चांगलेच ताटकळले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.