Pune | विधवा महिलांची फसवणूक करणाऱ्या पिट्या भाईला मोक्का लावण्याची नागरिकांची मागणी

पुणे,दि.9- सरकारी जागेवर ताबा मारून शेकडो बनावट दस्तऐवज तयार करत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट व्यक्ती उभी करून विधवा महिलांची तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिस पिट्या उर्फ मेहबूब शेख उर्फ पिट्या भाई हा आता पोलिसांनाच आव्हान देत आहे.

वानवडी पोलिसांत असलेल्या अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली केल्याचे मॅसेज विविध व्हॉट्‌सग्रुपवर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. यामुळे त्याच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची मागणी पिडीत नागरिकांसह माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी केली.

हडपसर, हांडेवाडी रोड परिसरात जागा पिट्याने व त्याच्या टोळीने बळकावली आहे. तसेच बनावट आधारकार्ड आणि पॅनकाडर्र बनवून तो ताबे मारून बेकायदेशिररित्या जागा विकत आहे. दरम्यान, तक्रार देण्यासाठी वानवडी, हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना हद्दीचे कारण सांगून कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नुकताच पिट्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करणारे पोलिस अधिकारी जोगदंड यांची नुकताच बदली गडचिरोली येथे झाली आहे.

याचाच फायदा घेत तो नागरिकांमध्ये आमच्या नादी लागायचे नाही, त्या प्रमाणे बदली करू, आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्याची आम्ही कशी बदली केली अशा प्रकारचे मेसेज सामाजिक माध्यंमांवर व्हायरल करत आहे असल्याचे इनामदार म्हणाले. सरकारी जागांचे बोगस दस्तऐवज या टोळीने केल्याने या टोळीवर स्वतंत्र गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

यावेळी विधवा महिलेच्या दोन दुकानावर ताबा मारल्यानंतर तिचा जगण्याचा प्रश्न यामुळे गंभीर झाला आहे. त्यातच उरूळी देवाची येथील े एका तक्रारदाराने एक गुंठा जागा घेतली. त्यासाठी त्याने साडे नऊ लाख रूपये दिले नंतर त्याला ती जागा बोगस असल्याचे समजले. तिसऱ्या तक्रारदारालाने तर ऑनलाईन तब्बल 16 लाखांचा व्यवहार केला. त्या जागा दाखविण्यात आली. तेथे त्याने शेडही मारले.

परंतु, पैसे मिळताच दुसऱ्या दिवशी त्याचे शेड काढून टाकून देण्यात आले. या आणि अशा शेकडो लोकांची या निमित्ताने फसवणूक झाल्याचे प्रकार तक्रारी असताना पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.