नवी दिल्ली – निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. CISCE बोर्डाने आज ICSE परीक्षा अर्थात १० वी चे तर ISC परीक्षा अर्थात १२ वी चे निकाल जाहीर केलेत.
CISCE बोर्डाच्या ICSC परीक्षेचा (१० वी) निकाल यंदा ९९.९८ टक्के इतका लागला आहे. तर ISC परीक्षेचा (१२ वी) निकाल ९९.७६ टक्के इतका लागलाय.
दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल CISCE बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ cisce.org, results.cisce.org येथे पाहता येणार आहेत.
यंदा करोना विषाणू महासाथीच्या पार्श्वभूमीवर CISCE बोर्डाने १० वी व १२ वी च्या लेखी परीक्षा घेतल्या नव्हत्या. त्यामुळे मूल्यांकनासाठी यंदा पर्यायी पद्धत वापरण्यात आली. लेखी परीक्षा घेतल्या नसल्याने उत्तरपत्रिका फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही.
ICSE Class 10 and ISC Class 12 results declared; the overall pass percentage for this year is 99.98% for ICSE results and 99.76% for ISC results pic.twitter.com/toncxXZPXY
— ANI (@ANI) July 24, 2021