पुणे – सी आय आर टी पुणे व प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना साठी सी आय आर टी पुणे यांच्या सर्टिफिकेट कोर्स चे आयोजन करण्यात आले. याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाचे रस्ता सुरक्षा विभाग उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव उपस्थित होते.
ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे ते संजय ससाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाचे उद्घाटन झाले.
परिसंवादात यशदा संचालक डॉ.सुनील धापटे, सेव पुणे ट्रॅफिक मुमेंट संचालक डॉ मुकुंद अभ्यंकर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ब्रिंडा मारुलकर (सीईओ फाउंडर डिलाइट इमेज कन्सलटन्सी) महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, अनिल पंतोजी, सतीश जंगम, सी आय आर टी चे प्रशांत काकडे यांनी सूत्रसंचालन केले.
यामध्ये दिनांक 8 ते 12 डिसेंबर व दिनांक 14 ते 18 डिसेंबर अशा एकूण साठ सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक दोन कोर्समध्ये सहभागी होणार आहेत. सी आय आर टी पुणे यांच्या वतीने भारतात प्रथमच सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांसाठी सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात आले.
यावेळी डॉ मुकुंद अभ्यंकर यांच्या संस्थेच्या वतीने सीडीचे उद् घाटन करण्यात आले. या सीडी उपस्थित सहभागी मोटार ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्या चालकांना देण्यात आल्या. या पाच दिवसाच्या परिसंवादात यशदाचे संचालक सुनिल धापटे यांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले व दुपारच्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तिमत्व विकास ब्रिंडा मारुलकर यांनी मार्गदर्शन केले.
पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे संचालक पाच दिवसाच्या परिसंवादात सहभागी झाले होते. मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन संस्थापक अध्यक्ष यशवंत कुंभार, विलास आपटे पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते आभार पवन नवाडे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी पुणे यांनी मानले.