पुणे- आम्ही सर्कशीत काम करतो. सर्कशीला प्रेक्षक नाही. त्यात हा कोरोना. आमती परिस्थिती फार वाईट आहे. आजुबाजुचे लोकं आम्हाला साधं पाणी सुद्धा देत नाही, असं रॅम्बो सर्कशीतील विदुषकाने फेसबुक लाईव्ह करुन सांगितलंं.
बिजु शीनी शीनी हे या विदुषकाचं फेसबुक अकाऊंटचं नाव आहे. हे बिजू नेहमी फेसबुक लाईव्ह करुन सर्कशीचं आयुष्य त्यांना येणाऱ्या समस्या सांगत असतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत सगळीकडे शुकशुकाट असल्यामुळे आमच्या पोटावर पाय आले आहेत. 250 जणांना एक मालक कसा खाऊ घालणार?त्यात सर्कस बघायला लोकं येत नाही, कोणत्याही ठिकाणी आम्ही राहतो. काहीही खातो. तुमच्या तर्फे जेवणाची मदत मिळाली तर आमच्या सारख्या कलाकारांचं भविष्य नीट राहीन, अशी मागणी त्यांनी प्रेक्षकांना केली आहे.
दरम्यान, कोरोनं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सगळ्यांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र हातावर पोट भरणाऱ्या लोकांनी काय करावं?, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.