आमदारकीसाठी इच्छुकांच्या सोशल मीडियावर “घिरट्या’

रणधुमाळी जाहीर नाही तरी जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी : नागरिकांचे मनोरंजन

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी सोशल मीडियावर जिल्ह्यातील इच्छुकांचा प्रचार दमदार बरसण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढविण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. या प्रचारामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच मनोरंजन सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी विधानसभेची रणधुमाळी सोशल मीडियावर जोरदार सुरू झाली आहे. लवकरच जाहीर सभांचे फड रंगू लागतील. आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू होईल. निवडणुकीची लढाई मैदानात लढली जाते, तितकीच तिची रणनीती राजकीय पक्षांच्या वॉर रुममध्ये देखील तयार केली जाते. उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या नेत्यांच्या सभा, दौरे, स्टार प्रचारक, विरोधकांकडून होणारे हल्ले तत्काळ परतवून लावणे, मतदार याद्यांपासून मीडिया ब्रिफिंगपर्यंत “सबकुछ’ या वॉररूमध्येच ठरते. 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी वॉर रूममधून सोशल मीडियावर फोकस केला आहे, त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षांचे वॉर रुम आता 365 दिवस दिवस-रात्र सुरुच असतात. त्यातच निवडणूक्‍क हंगामात ते अधिक जोमाने कामे करीत असतात त्यापदद्धतीने सध्या सर्वच पक्षांकडून कामे सुरू आहेत.

उमेदवारीसाठी अनेकांचे प्रयत्न
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सगळीकडेच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यात आघाडी किंवा युती होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची मोर्चेबांधणी जवळपास पूर्ण केली आहे. आपल्या पक्षाला जागा सुटणार की नाही, याच बरोबर आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत.

वॉररूम सज्ज
गेल्या पाच वर्षांपूर्वी विरोधक व आपण दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले
कामांची आकडेवारी व गावांनुसार याद्या जवळपास तयार
गेल्या पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांप्रमाणे कामे का झाली नाहीत त्याची उत्तरे आणि त्यात काय अडचणी आहेत याची मुद्देसूद व विश्‍लेषणात्मक पत्रके, व्हॉट्‌सऍपवर टाकण्यात येणाऱ्या माहितीची जुळवाजुळव करून ठेवलेली आहे.
विरोधकांनी विकासकामांत घातलेले “खो’
आगामी पाच वर्षांचे संकल्प
मतदारांना आकर्षित करणारी स्लोगन, थॉटस, गाणी तयार
विरोधकांवर टीका करणारी मिम्स, पोस्टर तयार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here