DSP मुलीला INSPECTOR वडिलांनी केलं ‘सॅल्युट’; पोलीस दलाने शेअर केला भावुक क्षणाचा PHOTO

नवी दिल्ली – प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठे नाव कमवावे. मुलांच्या कर्तृत्वामुळे आपली ओळख निर्माण व्हावी. जेव्हा आई-वडिलांचे हे स्वप्न पूर्ण होते तो दिवस, क्षण त्यांच्या आयुष्यातील खूप महत्वाचा असतो.

अशाच प्रकारचा एक क्षण एका वडिलांच्या आयुष्यात आला जेव्हा त्यांची मुलगी मोठी अधिकारी झाली. एवढेच नाही तर जेंव्हा त्यांची भेट झाली तेंव्हा वडिलांनी गर्वाने आपल्या अधिकारी मुलीला सॅल्युट केलं.

आंध्र प्रदेशात अशीच एक घटना पहायला मिळाली आहे. आंध्र प्रदेश सर्कल इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले श्याम सुंदर यांनी जेव्हा आपल्या मुलीला सॅल्युट केलं तेंव्हा तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे आनंदाने भरून आले.

आंध्र प्रदेश पोलीसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये फोटो शेअर करून म्हटले आहे की, ‘आंध्र प्रदेश पोलीस परिवराला सोबत घेऊन येतो. सर्कल इन्स्पेक्टर शाम सुंदर हे आपली मुलगी जेसी प्रसांती ज्या डीएसपी आहेत त्यांना गर्वाने आणि सन्मानाने सल्यूट करत आहेत.

अशी झाली भेट-

हा फोटो आंध्र प्रदेशातील तिरूपती येथील आहे. आंध्र प्रदेश पोलीस हे तिरूपती मध्ये ‘पोलीस ड्यूटी मीट 2021’ चे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान वडिल आणि मुलीची समोरासमोर भेट झाली.

शामसुंदर हे तिरूपती येथे कार्यरत आहेत तर मुलगी गुंटूर येथे डीएसपी पदावर कार्यरत आहे. मात्र, आयोजनादरम्यान त्यांची भेट झाली आणि मनाला भावूक करणारा क्षण समोर आला. जेव्हा एका वडिलांनी आपल्या अधिकारी मुलीला सल्यूट केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.