अजिंक्‍य रहाणेवर निवड समितीकडून अन्याय – दिलीप वेंगसरकर

मुंबई- विश्‍वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम 15 जणांचा संघ निवडत असून य संघातील खेळाडू अजुन निश्‍चीत करण्यात आलेले नाहीत. मात्र, संघातील तिसरा सलामीवीर आणि चौथ्या क्रमांकावरील फलंदाज निवडण्याच्या दृष्टीने संघ व्यवस्थापना समोर अडचणी असून या क्रमांकावर खेळू शकेल अशा अजिंक्‍य रहाणेचा समितीने विचारच केला नसून निवड समीतीकडून त्याच्यावर अण्याय करण्यात येतो आहे असे विधान माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरयांनी मुंबई येथे केले आहे.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार असलेल्या अजिंक्‍य रहाणे याने 2018 सालच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर अजिंक्‍यला एकाही एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आलेली नाही, असे म्हणत त्यांनी निवड समितीवर टिका केली आहे.

अजिंक्‍य रहाणेकडे दुर्लक्ष करुन भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर अन्याय करतय. इंग्लंडमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले आहे, याचसोबत तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. अजिंक्‍य भारतीय संघात सलामीला आणि चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी करु शकतो. तसेच मधल्या फळीत त्याचा अनुभव भारतीय संघासाठी कामाला येऊ शकतो. त्यातच अंबाती रायुडू गेल्या काही सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण येणार हा प्रश्‍न अजुनही कायम आहे. तसेच लोकेश राहुल अपयशी ठरत असल्याने त्याच्या ऐवजी तिसरा सलामीवीर म्हणुन अजिंक्‍य उपयोगी ठरु शकतो. मात्र, त्याच्या कडे कोणत्या कारणाने दुर्लक्ष केले जात आहे हेच समजत नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अजिंक्‍य गरजेच्या वेळी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करत, भारतीय संघाचा डावही तितकाच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. हा टी-20 विश्‍वचषक नाहीये. इकडे गरजेच्या वेळी तुमच्या संघाचा डाव सावरणेही तितकच महत्वाचे असते. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला किमान 280 धावांपर्यंतची धावसंख्या उभारावी लागणार आहे. त्यातच सध्याच्या मधल्याफळीतील फलंदाजा सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहेत त्यामुळे मधल्याफळीत अजिंक्‍य सारखा एखादा खेळाडू असणे हे सर्वांसाठी महत्वाचे असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.