पाच अट्टल दरोडेखोर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची नेवाशात सिनेस्टाईल कारवाई

नगर  – दरोड्याच्या तयारी असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या टोळीत कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे घातलेल्या दरोड्यातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नेवासे फाटा वनीकरण येथे सोमवारी (दि. 1) रात्री ही टोळी पकडताना पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये सिनेस्टाईल खेळ रंगला होता.

शहाराम छगन भोसले (वय 20, रा. नेवासे फाटा झोपडपट्टी, ता. नेवासे), उमेश हरसिंग भोसले (वय 20, रा. पिचडगाव, ता. नेवासे), बयन सुदमल काळे ऊर्फ बाळू (वय 29, रा. गेवराई, ता. नेवासे), रामसिंग त्रिंबक भोसले (वय 27) व डिचन त्रिंबक भोसले (वय 30, दोघे रा. सलबतपूर, ता. नेवासे) या पाच जणांना अटक केली आहे. अजय मिरीलाल कोळे (रा. पिचडगाव, ता. नेवासे) हा अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारून पसार झाला आहे. कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथे सराफ दुकानावर घातलेल्या दरोड्यातील शहाराम भोसले या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला आहे.

या टोळीकडून लोखंडी कोयता, सत्तूर, लाकडी दांडके, दोन दुचाकी व मोबाईल असा एकूण 42 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने नेवासे येथे केलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. घरफोडीबरोबर घरा घुसून मारहाण करून दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. आरोपी शहाराम भोसले याच्यावर नाशिक जिल्ह्यात दरोड्याच्या गुन्हा दाखल असून, तो तपासात उघडकीस आला आहे. उमेश भोसले याच्याविरोधात नाशिक, शेवगाव व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहाराम भोसलेविरोधात वाळुंजच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन, जळगाव येथील चाळीसगाव, कोपरगावात दोन व येवला पोलीस ठाण्यात एक, असे एकूण सात गुन्हे दाखल आहे. रामसिंग भोसले याच्याविरोधात संगमनेरमध्ये एक, नेवासेमध्ये तीन व वाळुंज एमआयडीसीमध्ये एक असे पाच गुन्हे दाखल आहेत. डिचन भोसले नेवासे पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.