सातारा – साताऱ्याचे जावई असलेले प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अर्जुन सोरटे यांच्या करिअरला मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच झळाळी मिळाली आहे. सध्या ते रवी जाधव यांच्या “अनन्या’ या आगामी बिग बजेट चित्रपटाच्या शेड्युलमध्ये व्यस्त आहेत.
अर्जुन सोरटे हे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे माजी सहाय्यक अभिरक्षक भास्कर मेहेंदळे यांचे जावई आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत “कॉफी आणि बरंच काही’, डबल सीट, राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट यासारखे अनेक चित्रपट म्हणजे सोरटे यांच्या कामाची पोचपावती आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ब्यू मुय्यांग व संजय दत्त प्रॉडक्शनच्या बाबा या चित्रपटाला एशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवात 15 नामांकने व तीन पुरस्कार मिळाले होते. मूळचे पुण्याचे असलेले अर्जुन हे प्रचंड मेहनती आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा व कोठारे व्हिजन यांच्या “पाणी’ या चित्रपटाला पर्यावरण प्रवर्गात राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. या चित्रपटाचे छायाचित्रण सोरटे यांनी केले आहे.