नोटबुक चित्रपटातील नायक झहीर इक्बाल व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांच्या लव्ह अफेअरबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. नुकताच सोनाक्षीने आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला. सोनाक्षीला ‘बर्थडे-विश’ करताना झहीरने केलेल्या पोस्टमध्ये आय लव्ह यु लिहल्याने दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
एवढंच काय तर सोनाक्षी व जहीर लवकरच लगीन गाठ बांधतील अशा बातम्या देखील झळकू लागल्या आहेत. मात्र आता या सर्व चर्चांवर स्वतः सोनाक्षीने भाष्य केलं असून लग्नासाठी माझ्या पाठीमागे हात धुवून का लागलाय? अशी विचारणा केली आहे.
याबबाबत सोनाक्षीने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये सोनाक्षी तिच्या लग्नाच्या बातम्या चालवणाऱ्या माध्यमांना लग्नासाठी माझ्या पाठीमागे हात धुवून का लागलाय? अशी विचारणा करतेय.
तिच्या या प्रश्नाचं माध्यमांच्यावतीने स्वतःच उत्तर देताना सोनाक्षी, ‘अच्छा लगता है मुझे मजा आता है’ या शाहरुख खानच्या डायलॉगवर लिप्स-सिंक करताना दिसतीये. या व्हिडिओला तिने, ‘प्रपोजल, रोका, मेहंदी, म्युझिक सगळे फिक्स झाले आहे, तर प्लिज मलाही सांगा.’ असं कॅप्शन दिलंय.
या व्हिडिओद्वारे सोनाक्षीने इंगेज असल्याच्या वा इतक्यात लग्न करणार असल्याच्या गॉसिप्स नाकारल्या आहेत. यामुळे झहीर-सोनाक्षी यांच्या लव्ह अफेअरबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा केवळ अफवाच ठरल्या आहेत. सोनाक्षीच्या या व्हिडीओ पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडला असून तिच्या लग्नाच्या चर्चा अफवा असल्याचं समजल्याने तिच्या मेल फॅन्सचा जीव भांड्यात पडल्याचं कमेंट्सवरून दिसतंय.