दिशा पटानी हे नाव बॉलिवूडमधील नवं सेन्सेशन म्हणून ओळखलं जात. तिच्या किलर लुक्सपुढे भल्याभल्या अभिनेत्री फिक्या पडतात. दिशाची लोकप्रियता तिच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या संख्येतूनच अधोरेखित होते. लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असलेल्या दिशाचा आज बर्थडे! गतवर्षी देशात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत असल्याने दिशाने आपला वाढदिवस घरीच साजरा केला होता. तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ व त्याची बहिण क्रिष्णा श्रॉफ हे दिशाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचले होते. यंदा मात्र करोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने दिशा आपल्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन करणार असल्याचं वृत्त आहे. दिशाच्या वाढदिवसानिमित्त काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील…
1. फिटनेसची आवड – अभिनेत्री दिशा पटानी ही तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ याच्याप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. दोघांचा जिम ट्रेनर देखील एकच असून त्याच नाव विक्रम स्वैन आहे. दिशा अनेकदा आपल्याया इन्स्टा हँडलवर वर्क आउट करतानाचे व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.
२. मिस इंडिया – दिशा ही मिस इंडिया स्पर्धेची मानकरी असून तिने हा खिताब इंदौर येथे 2013 मध्ये झालेल्या स्पर्धेत पटकावला होता. त्यावेळी दिशा केवळ 21 वर्षांची होती. 2016 मध्ये आलेल्या बाघी चित्रपटातून दिशाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळणार होता मात्र तिच्या जागी श्रद्धा कपूरची वर्णी लागली.
३. अभ्यासातही निपुण – आपल्या अभिनय गुणांमुळे प्रेक्षकांवर छाप सोडलेली दिशा अभ्यासातही तितकीच निपुण आहे. तिने कंप्यूटर सायन्समध्ये बी.ई. केले असून ती मूळची उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. शाळेत असताना आपण वर्गाची मॉनिटर असायचो अशी आठवण एकदा दिशानेच सांगितली होती.
४. ऍड स्टार – तुम्हाला कादाचित माहित नसेल मात्र दिशा अनेक गाजलेल्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. मेन विल बी मेन या इम्पेरिअल बलूच्या आयकॉनिक जाहिरातीत पिंक साडीतील मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ती दिशाच आहे.
५. रणबीर आवडता अभिनेता – दिशाने एका मुलाखतीमध्ये बोलताना आपला आवडता अभिनेता रणबीर कपूर असल्याचा खुलासा केला होता. तसेच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आपली रोल मॉडेल असल्याचंही दिशाने सांगितलं आहे.