Cinema Lovers day 2025 : वर्ष 2025 मध्ये एकापेक्षा एक अनेक शानदार चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. नुकताच अभिनेत्री कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 99 रुपयात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येत आहे. केवळ कंगनाचा ‘इमर्जन्सी’च नाही तर इतरही चित्रपटाचा आनंदही प्रेक्षक अवघ्या 99 रुपयात घेत आहेत.
17 जानेवारी 2025 ला देशात ‘सिनेमा लव्हर्स डे’ साजरा केला जात आहे. या दिवशी प्रेक्षकांना देशभरात कोणताही सिनेमा अवघ्या 99 रुपयात पाहण्याची संधी आहे. इमर्जन्सीसह इतर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून अवघ्या 99 रुपयात तिकिटांची विक्री केली जात आहे.
कंगनाच्या इमर्जन्सीसह प्रेक्षक ‘आझाद’, फतेह’, ‘गेम चेंजर’, ‘मुफासा: द लायन किंग’, ‘नोस्फेरातु’, ‘वुल्फ मॅन’, ‘ए रियल पेन’ आणि पुष्पा -2 हे चित्रपट लोकप्रिय देखील 99 रुपयांमध्ये पाहण्याचा आनंद घेत आहेत. याआधी देखील अनेकदा अशाप्रकारे 99 रुपयात चित्रपट तिकीट उपलब्ध करण्यात आले होते. कमी किंमतीत आवडते चित्रपट पाहता येत असल्याने प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.
99 रुपयात कसे मिळेल चित्रपटाचे तिकीट?
प्रेक्षक 99 रुपयांमध्ये चित्रपटाचे तिकीट बुक माय शो अॅपच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. बुक माय शो अॅपवर गेल्यावर प्रेक्षक त्यांच्या आवडीचा चित्रपट निवडू शकतात.त्यानंतर अवघ्या 99 रुपयात चित्रपटाचे तिकीट खरेदी करता येईल.