पुणे – मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग बंद आहे. सध्या उपबाजारात भाजीपाल्याची आवक होत आहे. तेथून आणि लगतच्या ग्रामीण भागातून शहरात पालेभाज्यांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्यामुळे सर्वच पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबिरीच्या जुडीची 50 रुपये भावाने विक्री होत आहे. तर, अन्य पालेभाज्यांच्या प्रतिजुडीस 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहे. बाजारात उपलब्ध बहुतांश मालाची प्रतवारी ढासळली असून, वाढलेल्या भावमुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.
करोनामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुलटेकडी मार्केट यार्ड गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबवले आहे. परिणामी, शहर आणि उपनगरांत भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोथिंबीर50
मेथी50
मुळा40
मेथी30
कांदापात30
अंबाडी30
चाकवत30