पुणे – केंद्र सरकारकडून सतत गॅस सिलेंडरची दरवाढ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ आज (दि. २७) पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर चूल आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.