…अन् तळीरामांनी दारूची लत भागविण्यासाठी चक्क पिले सॅनिटीझर

मुंबई – करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असतानाच आज महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारतर्फे याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून सुधारित निर्बंध जाहीर करण्यात आलेत. या निर्बंधांची अंमलबजावणी  22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून होणार आहे.

हे नियम 1 मे सकाळी 7 पर्यंत लागू असतील.  या काळात वाईन शॉप बंद असल्यामुळे तळीरामांची चांगलीच फजिती झाली आहे.यादरम्यान काही ठिकाणी कायदे हातात घेऊन मद्यपी वाईन  खरेदी करताना दिसत आहे. यातच पुन्हा अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घटली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, दारू न मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यात ५ तळीरामांनी चक्क  सॅनिटीझर पिले. यानंतर या तळीरामांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाऊन मध्ये दारू दुकान बंद आहेत त्यामुळे दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटीझर पिल्याची माहिती नातलगांनी दिली आहे. दत्ता लांजेवार , नूतन पाथरटकर,  गणेश नांदेकर , संतोष मेहर सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तीची नाव आहेत ज्याचा सॅनिटीझर पिल्याने मृत्यू झाला आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.