चर्चच्या सजावटी, विद्युत रोषणाईची कामे पूर्ण, बाप्तिस्मा महाविधीचे आयोजन
नगर – राज्याचे जेरूसलेम म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नगर शहरात नाताळ निमित्त उत्साही वातावरण निर्माण होवू लागले असून नाताळच्या निमिताने गायल्या जाणाऱ्या प्रभु येशूख्रिस्ताच्या स्तुती गायनाला (कॅरल सिंगिंग) ख्रिस्ती बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
नाताळसाठी चर्चची रंगरंगोटी विद्युत रोषणाई आदी कामांनी वेग घेतला असून सजावटीचे काम पुर्णत्वास येत आहे. एकुणच नाताऴ,नववर्षाच्या स्वागता साठी सगळेच चर्च सज्ज झालेले आहेत. नताळनिमित्ताने विविध चर्चच्या माध्यमातून निरनिराळ्या कार्यक्रमांचे तसेच या निमित्ताने काही स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.
नगर मधील सर्वात जुन्या असलेल्या ह्युम मेमोरीयल चर्चच्या वतीने दि. 22 रोजी शुभ्र देणगीची उपासना आयोजित केली असून दि.24 रोजी मध्यरात्रीची उपासना बुधवारी सकाळी 9.30 ला ख्रिस्त जन्मोत्सव उपासना, तर गुरूवारी स्नेहमेळावा, शुक्रवारी शाब्बाथ शाळा कार्यक्रम, शनिवारी केक डेकोरेशन स्पर्धा आणि संतुलित आहार थाळी तयार करणे, रविवारी ग्रिटीग्ज कार्ड बनविणे, कॅम्प फायर सोमवारी कॅंन्डललाईट उपासना दि.31 रोजी प्रभूभोजन विधीत्याच दिवशी मध्यरातीची उपासना, बुधवारी नववर्ष उपासना व बाप्तिस्मा विधी. होणार असून यामधील काही कार्यक्रम गॉर्डन हॉल येथे तर काही कार्यक्रम न्यु चर्च येथे होणार आहेत.
तर तारकपूर येथील सेंट सेविअर्स चर्च मध्येही वीस तारखेपासूनच नाताऴच्या कार्यक्रमांना सुरवात झाली. असून त्यात दि.20 रोजी धार्मिक कार्यक्रम दि.21 रोजी चित्रकला स्पर्धा, दि.22 रोजी खिसमस रॅली, दि.25 रोजी मौज मेळावा, दि.29 रोजी कॅम्प फायर नववर्ष दिनी मेऴाव्याचे आयोजन करण्यात आले आहे दि.31 डिसेंबर सायं, 5 वाजता बाप्तिस्मा विधी आणि रात्री 11.30 वाजता पवित्र संगीत महाविधी व उपदेशाचा कार्यक्रम होणार असून नववर्षदिनी पहिली भक्ती सकाळी 6.30 आणि दुसरी भक्ती 8.30 वाजता होणार असून यात प्रभुभोजन विधी, पवित्र संगीत महाविधी होणार आहे.