नवी दिल्ली : देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात
क्रिसमस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आशा करता हूँ कि यह त्यौहार शांति और समृद्धि का प्रसार करते हुए समाज में सौहार्द बढ़ाएगा। आइए, हम ईसा मसीह की प्रेम, करुणा और परोपकार की शिक्षाओं का अनुसरण करें तथा समाज व राष्ट्र के हित के लिए संकल्पबद्ध रहें।
— President of India (@rashtrapatibhvn) December 25, 2020
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं.
Merry Christmas!
The life and principles of Lord Christ gives strength to millions across the world.
May his path keep showing the way in building a just and inclusive society.
May everybody be happy and healthy.
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2020
दरम्यान, करोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी 20 पेक्षा अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, 60 वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.