विविध कार्यक्रमांचे आयोजन
नगर शहरात ख्रिस्ती बांधवांची संख्या लक्षणीय असल्यानेच या शहराला महाराष्ट्राचे जेरूसलेम म्हटले जाते. नाताळनिमित्त नगरमधील सर्व चर्च चांगल्या पद्धतीने सजविली जातात. विद्युत रोषणाईही केली जाते. नाताळनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नगर – राज्याचे जेरूसलेम समजल्या जाणाऱ्या नगर धहरात नाताळनिमित्त ख्रिस्ती प्रार्थना स्थळांची रंगरगोटी करायला सुरवात झाली असून ख्रिस्ती बांधवांच्या घरातूनही सजावटीची लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठही सजावटीच्या साहित्याने सजू लागली आहे.
बाजारात नाताळ निमित्त सजावटीचे साहित्य मोठ्याप्रमाणावर उपलब्ध आहे. त्यात चांदण्या ,मेणबत्त्या, घंटा, आदी वस्तूंचा समावेश आहे. नाताळाच्या दिवशी प्रभुयेशूख्रिस्ताचा जन्म गव्हाणीत झाल्याने गव्हाणी सजविण्यात येतात.त्यासाठी लागणाऱ्या मुर्तीही बाजारात उपलब्द आहेत. याशिवाय नाताळ मध्ये मेणबत्त्यांचे विशेष महत्व असल्याने बाजारात विविध प्रकारच्या मेणबत्त्याही उपलब्ध आहेत.
नाताळबाबा येतो आणि मुलांना बक्षिसे देवून जातो अशी एक अख्यायिका आहे. त्याप्रमाणे निरनिराळ्या आलारातील आणि प्रकारातील नाताळ बाबाही बाजारात आपले अस्तित्व टिकवून आहेत. नाताळम्हणजे प्रभुयेशूख्रिस्ताच्या आगमनाची शुभवार्ता देणारा सण असल्याने त्याच्या आगमनाची वार्तादेण्यासाठी ठिकठिकाणी घंटा बांधण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे सजावटीत प्रत्येक ठिकाणी घंटांचा वापर करण्यात येतो.
येशूख्रिस्ताच्या आगमनाची चाहूल म्हणून चांदण्यांचा वापरही मोट्या प्रमाणात करतात.दिवाळी प्रमाणेच चांदणीच्या आकाराचा दिवा प्रत्येकाच्या अंगणात लावला जातो. त्याचप्रमाणे झावळ्यांना विशेष महत्व असल्याने ख्रिसमस ट्री सजविण्याची प्रथाही मोठ्याप्रमाणात जपली जाते. त्यासाठीचे साहित्य सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सजावटी साठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती पुढील प्रमाणे स्टार (चांदण्या)30 ते 400रुपयांपर्यंत सजावटीसाठी लागणाऱ्या छोट्या चांदण्या 30 ते 150, नाताळबाबाची टोपी 20 ते 60, घंट्या 10 ते100 ,ख्रिसमस ट्री30 ते 2500, सजावटी साठी लागणारे निरनिराळ्या आकाराचे बॉल्स30 ते 100 नाताळबाबा 30 ते 8500 ,मेरी ख्रिसमसव हेपी न्यु इयरचे बेॅनर्स वॉलस्टिकर्स 60 ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.