ख्रिश्‍चन मिशेलचा जामीनासाठी अर्ज

नवी दिल्ली: तपास आधिकाऱ्यांनी 60 दिवसांच्या मुदतीत आपल्या विरोधात आरोपत्र दाखल न केल्याने आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज ख्रिश्‍चम मिशेल याने आज दिल्लीच्या कोर्टात केला. या प्रकरणात संबंधीत तपास यंत्रणांनी येत्या 12 फेब्रुवारी पर्यंत आपली भूमिका मांडावी असा आदेश देत विषेश न्यायाधिश अरविंदकुमार यांनी या अर्जावरील सुनावणी तो पर्यंत पुढे ढकलली आहे.

ख्रिश्‍चन मिचेल हा ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील मध्यस्थ आहे आणि त्याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. तो 22 डिसेंबर पासून ईडीच्या ताब्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात तपास यंत्रणा काय भूमिका मांडणार याच्यावर मिशेलच्या सुटकेचा निर्णय अवलंबून आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)