कोल्ड प्ले बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनेचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्याने मरीन ड्राव्हला भेट देत त्याची एक पोस्ट इन्स्टाग्रावर शेअर केली होती. यानंतर या बँडचा पहिला शो शनिवारी संध्याकाळी मोठ्या उत्साही वातावरणात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडला. आपल्या दमदार कामगिरीने ख्रिस मार्टिने आणि त्याचा बँड कोल्डप्ले यांनी प्रेक्षकांना मोहित करण्यात यश मिळवले. यावेळी मार्टिनने त्याच्या चाहत्यांवर प्रभाव पाडत हिंदीमधून श्रोत्यांचे आभार मानले.
कोल्ड प्ले हा ब्रिटीश बॅंड असून या बँडमधील मुख्य गायक ख्रिस मार्टिन आणि त्याचे सहयोगी कलाकार भारत टुरसाठी भारतात दाखल झाले आहेत. या बँडच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. शोमधील गाणी आणि मार्टिन यांचा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला. ख्रिस मार्टिन त्याच्या कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरचा भाग म्हणून भारतात आला आहे.
…आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या
शनिवारी, ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन याने मुंबईत परफॉर्म केले. यादरम्यान शोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासाठी मी तयार आहे. मी तुझ्याबरोबर एव्हरग्लो खेळू शकतो का?” यानंतर ख्रिस चाहत्याला म्हणाला, “आम्ही एकत्र गाणार आहोत, ठीक आहे?” त्यानंतर फॅन पियानो वाजवतो आणि ख्रिस त्याच्या शेजारी बसला. या व्हिडिओला नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
Coldplay's Chris Martin greeted the Mumbai audience with JAI SHREE RAM 🚩
The world knows the power of Prabhu Shri Ram.#ColdplayMumbai pic.twitter.com/YDnl7nH22P
— Sunanda Roy 👑 (@SaffronSunanda) January 19, 2025
हिंदीमधून मानले आभार अन् जय श्री राम
त्यानंतर शोदरम्यान चाहत्यांनी हातात उचलेले बोर्ड तो वाचत होता. यातील एका बोर्डवर ‘जय श्री राम’ असे लिहिले होते. ख्रिसने ते वाचले, जय श्री राम. तसेच ख्रिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो परफॉर्म केल्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानतो. एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर एका तरुण चाहत्यासोबत गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो चाहता ख्रिसच्या शेजारी उभा असल्याचे दिसते. आप सबका बोहोत स्वागत है. मुंबई में आकार हमे बोहोत खुशी हो रही है. आम्ही इथे येऊन खूप आनंदी आहोत. हा आमचा भारतातील पहिला खरा शो आहे. त्यामुळे धन्यवाद. नमस्ते, ख्रिस मार्टिनच्या प्रभावी हिंदी भाषेबद्दल चाहत्यांनामध्ये एक उत्साह दिसून आला.