Chris Gayle : ख्रिस गेलच नाव ऐकलं कि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे मैदानात होणार षटकार आणि चौकारांचा पाऊस. गेलने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर अनेक मोठं मोठे विक्रम रचले आहेत. चाहते त्याची फलंदाजी पाहण्यासाठी कायमच उत्सुक असतात.
मागील बऱ्याच काळापासून ख्रिस गेल ( Chris Gayle ) क्रिकेट खेळताना चाहत्यांना पाहायला मिळालेला नाही. मात्र आता पुन्हा एकदा गेल क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. तो लीजेंड लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. महत्वाचं म्हणजे भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील गेलसोबत एकाच संघात खेळताना दिसणार आहे.
लीजेंड लीग क्रिकेटमध्ये तो गुजरात जायंट्स या संघाकडून खेळणार आहे. त्यासाठी ख्रिस गेल ( Chris Gayle ) भारतात पोहोचला आहे, ( Chris Gayle Come to India For Playing legend League cricket ) परंतु तो किती आणि कोणत्या सामन्यात खेळायला उतरणार याबाबत माहिती मिळालेली नाही. गुजरात जायंट्स संघाचा सामना भिलवाडा किंग्सशी बाराबती स्टेडियमवर खेळाला जाणार आहे.
क्रिकेटचा सर्वात छोटा फॉरमॅट असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये गेलने ( Chris Gayle ) आपल्या नावाचा दबदबा नेहमीच कायम ठेवला. तो मैदानात फलंदाजीस उतरताच गोलंदाजाला त्याच्या षटकार आणि चौकारांची भीती जाणवायची. गेलने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ४६३ सामन्यांत सर्वाधिक १०५६ षटकार ठोकले आहेत. ते काही असो मात्र आता गेल पुन्हा एकदा मैदानात उतरणार म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा असेल.