हॉलिवूडमधील प्रसिद्ध हिपहॉप गायक, संगीतकार ख्रिस ब्राऊन हा लग्नापूर्वीच दुसऱ्यांदा बाबा होणार आहेत. ख्रिसचे ब्रेकअप झाले असूनही ऍमिका हॅरिस त्याच्या मुलाची आई होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ख्रिस आपल्या एक्स-गर्लफ्रेण्डकडे पुन्हा परतेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत ख्रिस किंवा ऍमिका या दोघांपैकी कोणीही तिच्या प्रेग्नन्सीविषयी जाहीर वाच्यता केलेली नाही. मात्र, ख्रिसने ऍमिकाच्या सोशल मीडियावरील फोटोवर “माय बेबी मामा’ अशी कमेंट केल्यानंतर चर्चांना उधाण आले. पितृत्व ही तुम्हाला अत्यंत विनम्र करणारी गोष्ट आहे, असे ख्रिसने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. 30 वर्षांचा अविवाहित ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. निया गुजमेनपासून त्याला पाच वर्षांची रॉयल्टी ही मुलगी आहे. ख्रिस काही महिन्यांपूर्वी ऍमिकासोबत रिलेशनशीपमध्ये होता. ब्रेकअपनंतर त्याचे इंडीमॅरी जेन पेल्टनशी सूत जुळले. मात्र तोवर ऍमिका प्रेग्नंट असल्याचे समोर आले. त्यामुळे इंडीमॅरीसोबत ख्रिसचे ब्रेकअप झाल्याचे समजते. आता तो ऍमिकाकडे पुन्हा परतणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.