मुंबई – सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळ केलाचा आरोप एका को-डान्सरने केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड जगतात खळबळ उडाली आहे.
आचार्यवर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणे असे आरोप 35 वर्षीय को-डान्सरने केले आहेत. यापूर्वीही अनेक सहकर्मचाऱ्यांनी गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यानी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
को-डान्सरने केलेल्या आरोपानुसार, ‘गणेश आचार्यने तिला कथितरित्या सांगितले की, जर तिला यशस्वी व्हायचे असेल तर मे 2019 मध्ये तिला त्यांच्यासोबत सेक्स करावा लागेल. तिने नकार दिला आणि सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचे सदस्यत्व रद्द केले’ असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.