चंद्रपूरकरांची चिंता वाढली; कोरोनाबधितांची संख्या 22वर

चंद्रपूर-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता.

जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे.

चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) २४ मे ( एकूण रूग्ण २ ) आणि २५ मे ( एकूण रूग्ण एक ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २२ झाले आहेत.

दरम्यान, बाहेर शहरातून येणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली त्यामुळे कोरोना बधितांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.