“तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”

वानखेडेंच्या सरमर्थनार्थ चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्ला

मुंबई – क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारकडून गंभीर आरोप केले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केले आहेत.

समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी खंडणी मागितल्याचाही आरोप आहे. दरम्यान आज समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणाला जीवे मारण्याच्या, लटकवण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा केला केला.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवरती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज ट्विट करत तुम्ही कितीही धमक्या दिल्या अपमान केला, त्याच्या आई-वडीलांना बदनाम केले, पत्नीला शिव्या दिल्या, बहिणीवर आरोप केले, एवढंच नव्हे तर तुम्ही त्याचा जात धर्म देखील काढलात, तरीही तो डगमगला नाही. कर्तव्य बजावत राहीला ‘तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला’. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचे समर्थन केले आहे.

सत्याचाच विजय होणार –

या प्रकरणातून माझे पती बाहेर पडणारच ते प्रामाणिक अधिकारी आहेत शेवटी सत्याचाच विजय होणार असा विश्वास क्रांती रेडकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच विरोधकांना वेळेवर उत्तर देईल, असेही त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.