मुंबई- कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही शिरकाव केला आहे. तीन दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड सुरु झाला. अभिनेते ‘चिरंजीवी’ यांचा देशातच नव्हे तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन आणि हटके अंदाजामुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत.
दरम्यान, आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली असता चिरंजीवी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वतः चिरंजीवी यांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. चुकीच्या टेस्टिंग किटमुळे रिपोर्ट मध्ये गोंधळ झाला असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
A group of doctors did three different tests and concluded that I am Covid negative & that the earlier result was due to a faulty RT PCR kit. My heartfelt thanks for the concern, love shown by all of you during this time. Humbled ! 🙏❤️ pic.twitter.com/v8dwFvzznw
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 12, 2020
चिरंजीवी म्हणाले कि, “रविवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले होते. पण लक्षणं नसल्याने मला शंका आली. डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा सीटी स्कॅन करायला सांगितलं. त्यातही कोरोनाचा संसर्ग गिसला नाही. मग पुन्हा टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही माझी तीन वेगवेगळ्या किटने चाचणी करण्यात आली. RT PCR टेस्टही पुन्हा केली गेली. पण तीही निगेटिव्ह आली आहे. चुकीच्या टेस्टिंग किटमुळे हा गोंधळ झाला होता. या काळाच तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे”. या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.