Chirag Paswan । Modi government account allocation – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिपदांची विभागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्र्यांना मागच्या वेळेप्रमाणेच स्थान देण्यात आले आहे. अमित शहा गृहमंत्री तर ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री राहतील.
याशिवाय नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री असतील. अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा दोघे रस्ते वाहतूक राज्यमंत्री असतील. नितीन गडकरी हे त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात रस्ते वाहतूक मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांना अन्न प्रक्रियामंत्री मंत्रालय देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे आणि इतकंच नाही तर त्यांच्या पक्षानं पाच जागा लढवल्या आणि पाचही जिंकल्या. आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आलं आहे.
चिराग पासवानची संपत्ती 1.84 कोटी रुपये!
संगणक अभियांत्रिकीमध्ये बीटेक केलेले आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये अभिनयाच्या मार्गे राजकारणात प्रवेश केलेल्या चिराग पासवान यांनी 2014 साली जमुई बिहारमधून निवडणूक जिंकली.
वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ते आता हाजीपूर या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, 2014 मध्ये निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण चल आणि स्थावर मालमत्ता 1.84 कोटी रुपये आहे. चिरागवर कोणतेही कर्ज नाही.
शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक, 90 लाखांचे घर –
चिराग पासवान यांनी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सहा कंपन्यांमध्ये सुमारे 35 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी स्वत:साठी कोणतेही विमा किंवा बचत खाते उघडलेले नाही आणि कोणतेही कर्ज घेतलेले नाही.
इतकंच नाही तर चिराग पासवानकडे ना सोन्या-चांदीचे दागिने आहेत ना त्यांच्या नावावर कोणतेही शस्त्र नोंदवले गेले आहे. जंगम मालमत्तेतील कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, चिराग पासवानला लक्झरी वाहनांचाही शौक आहे.
त्याच्याकडे जिप्सी , फॉर्च्युनर कार आहे. स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर चिराग पासवान यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन किंवा व्यावसायिक इमारत नाही. त्यांच्या नावावर एक घर असून, त्याची किंमत सुमारे 90 लाख रुपये आहे.