#Video : केंद्रीय मंत्री राणेंच्या चिपी विमानतळाबाबतच्या विधानाचा मलिकांकडून समाचार

मुंबई –  चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. आता काम पूर्ण झाले असताना हे काम भाजपमुळे झाले असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

या कामात भाजपची कोणतीही भूमिका राहिलेली नाही, असे स्पष्ट करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते  नवाब मलिक यांनी समाचार घेतला.

चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्यात आला होता. या कामाची सुरुवात एमआयडीसीच्या माध्यमातून झाली. आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी हे काम पूर्ण झाले असताना भाजपमुळे विमानतळ होत असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम होत आहे अशी टीका मलिक यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.