शहजानपूर : स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या युवतीच्या आईचा जबाब घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना समन्स बजावले आहे. चिन्मयानंद यांच्याच संस्थेत ती नोकरीला आहे. दरम्यान न्यायदंडाधिकाऱ्यापुढे अरोपांचे प्रतिज्ञापत्र सादर करून दोन दिवस उलटूनही चिन्मयानंदवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याचा इशारा या युवतीने दिला आहे.
या प्रकरणातील संबंधितांचे जबाब घेऊन त्याबाबतचा अहवाल न्यायलयात 23 तारखेला एसआयटीला सादर करायचा आहे. या युवतीच्या आईला यावर्षी मे माहिन्यात चिन्मयानंद याच्या आश्रमामार्फत चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयात नोकरी देण्यात आली. त्यांच्या नियुक्तीशी संबंधीत कागदपत्रे प्राचार्यांनी एसआयटीला दिली आहेत. चिन्मयानंद प्रकैती अस्वस्थ वाटत असल्याने सरकारी रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्यावर चार जणांचे वैद्यकीय पथक उपचार करत आहेत.
मी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब देऊन दोन दिवस झाले तरी गुन्हा नोंद झालेला नाही. त्याला अटक न झाल्यास मी आत्मदहन करेन. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यास होणारा विलंब पाहता हे सरकार माझ्या मृत्यूची वाट पहात आहे का?असा सवालही या युवतीने केला.