चिनमयानंदवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या युवतीचा लॉ मास्टर्सला प्रवेश

शहाजानपूर : भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या युवतीने पोलिस बंदोबस्तात येऊन बरेली विद्यापीठात मास्टर्स ऑफ लॉसाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने पोलिसांना त्याबाबत आदेश दिला होता.

ता युवतीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विद्यापीठात आणण्यात आले. परीक्षा आणि ग्रथांलयासह विविध अर्ज तिने भरले. त्यानंतर तिची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तिच्या भावाने कालच प्रवेश शुल्क भरले होते,असे महात्मा फुले रोहिखंड विद्यापीठ, बरेलीचे विधी विभाग प्रमुख अमित सिंग यांनी सांगितले.

स्वामी चिन्मयानंद यांनी ही युवती त्यांच्या कॉलेजमध्ये शिकत असताना बलात्कार केला, असा आरोप केला होता. तिने खंडणी मागितल्याचा आरोप चिन्मयानंद यांनी केला. त्यानुसार तिला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.