सॉफ्ट टेनिस स्पर्धेत चिन्मय, आयुषाला सुवर्ण

पुणे – जळगांव येथे झालेल्या 8 व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर आणि वरिष्ठ सॉफ्ट टेनिस स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी दोन सुवर्णपदक, दोन रजत तर, दोन ब्रॉंझपदके मिळवत स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटने तर्फे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुण्यासह जळगांव, बुलढाणा, मुंबई, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद आणि सोलापूर या 10 जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.

पुण्याच्या आयुषा इंगवले हिने सब-ज्युनिअर गटामध्ये रजतपदक मिळवले. वरिष्ठ गटात आयुषाने सुवर्णपदक मिळवले.पुण्याच्या चिन्मय मेहता याने वरिष्ठ गटात सुवर्णपदकासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा मान पटकावला.

अयाती दांदडे हिने सब-ज्युनिअर गटात आणि वरिष्ठ गटामध्ये रजतपदक मिळवत दोन पदकांची कमाई केली. रिषी वुरा याने वरिष्ठ गटात ब्रॉंझपदक मिळवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटने अध्यक्ष सुनील पूर्णपाने, सहसचिव रविंद्र सोनावणे, महासचिव अमोल पाटील, जळगांव सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.