चेन्नई : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आजपासून भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारतासोबत अनेक मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शी जिनपिंग हे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत त्याच आयटीसी ग्रॅंड चोला या चेन्नईच्या आलिशान हॉटेलच्या बाहेर तिबेटच्या नागरिकांनी विरोध प्रदर्शन केले. दरम्यान, या विरोध प्रदर्शन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
#WATCH Chennai: Police detained Tibetan activists who were protesting outside the ITC Grand Chola Hotel where Chinese President Xi Jinping will arrive later today. #TamilNadu pic.twitter.com/fgJkQyX0gs
— ANI (@ANI) October 11, 2019
क्षी जिनपिंगच्या भारत दौऱ्यापूर्वी काही तिबेटी लोकांनी चेन्नईत त्यांचा विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाच तिबेटी लोकांना ताब्यात घेतले. क्षी जिनपिंगला विरोध करण्याच्या उद्देशाने हे सर्व एकत्र आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग 11-12 ऑक्टोबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथे अनौपचारिक शिखर बैठक घेणार आहेत. पंतप्रधानांच्या निमंत्रणानंतर, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी 11-12 ऑक्टोबरला भारतातील चेन्नईला भेट देतील असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.