नवी दिल्ली : चीनच्या आतंरराष्ट्रीय आक्रमक हालचालींदरम्यान आज तैवानमध्ये चीनचे सुखोई-३५ फायटर जेट विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
Taiwan claims to have shot-down a PLAAF Su-35 which violated its airspace over the Taiwan Straits.Pilot injured and captured.Early to confirm the aircraft type as PLAAF and PLANAF have multiple Flanker versions like the J-11 , J-15 , Su-35 and the Su-33 pic.twitter.com/0hizTpmbSv
— Hukum 🇮🇳 (@hukum2082) September 4, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात उड्डाण केले. त्याच वेळी, तैवानच्या एअर डिफेन्सने चिनी विमानावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यासाठी तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार चीनने हे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने पडल्याचं सांगितलं आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तैवानने चीनला अनेकदा हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने अखेर हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानाला लक्ष्य केलं. यामध्ये विमानाचा पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.