नवी दिल्ली – भारतीय सैनिकांनी पुर्व लडाख मध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या एका चिनी सैनिकाला पकडले आहे. पॅंगगॉंग तलावाच्या बाजुला दक्षिणेकडे त्याचा वावर असल्याची बाब काल भारतीय जवानांच्या लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
तो भारतीय हद्दीत चुकुन आला की कोणत्या तरी हेतूने आला याचा शोध घेतला जात आहे. विदेशी सैनिकाला पकडल्यानंतर त्याच्या संबंधात जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या अंतर्गत त्याच्या बाबतीत व्यवहार केला जाईल अशी माहिती भारतीय लष्करी सुत्रांनी दिली.
त्याला चौकशी पुर्ण झाल्यावर आणि जर तो निर्दोष आहे हे सिद्ध झाले तर चीनी लष्कराच्या ताब्यात दिले जाणार आहे. चीनकडून मागेही अशाच काहीं घटना घडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सैनिकांना पुन्हा चीनच्या ताब्यात देण्यात आले होते.