चीनची नाईन ड्रॅगन पेपर्स कंपनी महाराष्ट्रात उभारणार पेपर निर्मितीचा उद्योग

मुंबई – चीन येथील नाईन ड्रॅगन पेपर्स ही कंपनी महाराष्ट्रात पेपर निर्मितीचा उद्योग उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते.

पहिल्या पाच वर्षात नाईन ड्रॅगन कंपनी जवळपास 4500 कोटी रूपये यासाठी गुंतवणूक करणार आहे. यातील एक बिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक पहिल्या टप्प्यात कंपनी तर्फे करण्यात येणार आहे. तसेच या कंपनीमुळे 10 हजारापेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील अस यावेळी सांगण्यात आलं आहे.

पहिल्या टप्प्यात एक बिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या या उद्योगासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here