वुहान (चीन) : येथील वुहांग रुग्णालयाचे संचालक डॉ. लिऊ झिमिंग यांचे कोरोनाच्या बाधेमुळे निधन झाले. त्यांना वाचवण्याचे केलेले सर्व प्रयत्न अखेर तोकडे पडले. ते मरण पावल्याचे वृत्त चिनी ब्लॉगर आणि माध्यमांनी मंगळवारी सकाळी दिले होते. मात्र नंतर ते बदलले होते.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचा या विषाणूंमुळे मृत्यू झाला होता. ते एक हजार 716 कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती, असे चीनने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यानंतर चीन प्रशासनाने त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या बातम्या बदलण्यात आल्या होत्या. सरकारी टेलीव्हिजन सीसीटीव्हीने दुपारी त्यांचे निधन झाल्याचे अधिकृत जाहीर केले.
कोरोनाच्या भीषण साथीची प्रथम कल्पना मांडणारे लि वेनलिंग यांचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला होता. सार्स सारख्या आजाराने बाधीत सहा रूग्ण आढळले असून त्यांना विलगता कक्षात ठेवण्यात आल्याचे ली यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते. या साथीच्या संभाव्य भीतीची धोक्याची घंटा वाजवणाऱ्या ली यांना पोलिसांच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले होते. अशी बाधा झालेल्या चिंताजनक प्रकृती असणाऱ्या एका महिलेवर उपचार करताना त्यांनाही लागण झाली होती.
या साथीत मरण पावलेल्यांची चीन सरकारने अधिकृत जाहीर केलेली संख्या एक हजार 868 आहे. तर बाधीतांची संख्या 72 हजार 436 झाली असल्याचे सांगण्यात आले. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या एक हजार 701 आहे.