ब्रुसेल्स: दलाई लामांचा उत्तराधिकारी नियुक्तीमध्ये चीनने हस्तक्षेप करण्यास युरोपिय संघाकडून असलेला विरोध अजूनही कायम आहे. तिबेटच्या बौद्ध परंपरेला अनुसरून चीनने दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधामध्ये हस्तक्षेप करू नये, असे युरोपिय संघाने म्हटले आहे. युरोपिय संसदेच्या पाच खासदारांनी यासंदर्भातील प्रश्न युरोपिय परराष्ट्र प्रमुख जोसेफ बोरेल यांना विचारला होता. त्याला अनुसरून युरोपिय संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जानेवारी महिन्यात युरोपिय संसदेने तिबेटी परंपरेला अनुसरून “तिबेट पॉलिसी ऍन्ड सपोर्ट ऍक्ट’ला एकमताने मंजूरी दिली होती. तिबेटच्या लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण करण्यात यावे आणि त्यांच्या भूमिकेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कायद्याला एकमताने मंजुरी देण्यात आली होती. या कायद्यानुसार दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधाच्या प्रक्रयेत चीनच्या कोणत्याही हस्तक्षेपास युरोपिय संघाने मज्जाव घातला आहे.
सध्याच्या 14 व्या दलाई लामांचे उत्तराधिकारी शोधण्याच्या प्रक्रियेत चीनने पुढाकार घेतला आहे. मात्र त्याला तिबेटमधील धार्मिक नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे.