छिंदमची राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

नगर – छत्रपती शिवजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन उपमहापौर व विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या नगरसेवक पदाबाबत महासभेने केलेल्या ठरावावर सुनावणी पूर्ण झाली आहे. ही नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पार पडली असून, मनपासह छिंदमनेही म्हणणे सादर केले आहे. या प्रकरणी आता मंत्र्यांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला असून, राज्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली आहे.

मागील सुनावणीला छिंदमने उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र दिल्यामुळे 22 ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यात छिंदमने महासभेने ठेवलेले आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात न्यायालयात प्रकरण असून, निर्णय झालेला नसल्याचेही म्हणणे मांडण्यात आले आहे. या प्रकरणी आता नगरविकास राज्यमंत्र्यांकडून निर्णय घेतला जाणार असल्याने निकालाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here