पिंपरी (प्रतिनिधी) – आजच्या युगात माझी ताई एक कर्तृत्ववान स्त्री झालेली मला बघायचे आहे. शिक्षण ही त्या कर्तृत्वाची पहिली पायरी आहे. आवडत्या विषयात भरपूर शिक्षण घेता यावे. चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता यावा. त्यांची तजवीज करणे, ही भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे, असा संकल्प भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी रविवारी (दि.3) केला आहे.
भाऊबीज सणाच्या दिवशी चिंचवड विधानसभा मतदार संघातील असंख्य महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाखो महिला भगिनींचे आभार मानत वरील संकल्प करायचे ठरविले आहे. शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेविका व नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या.
शंकर जगताप म्हणाले की, बहिणीच्या शिक्षणाचा मार्गात आर्थिक, सामाजिक अडथळे येऊ नयेत. तुझे शिक्षण निर्विघ्नपणे पार पडावे. तू उच्चविद्याविभूषित व्हावीस, यासाठी मी प्रयत्न करेन. तुझ्या ‘सक्षमते’ची दुसरी पायरी म्हणजे आर्थिक स्वावलंबन. नोकरी असो, व्यवसाय असो वा स्वयंरोजगार यापैकी तुझ्या आवडीचा पर्याय निवडायचे स्वातंत्र्य तुला असायला हवे. कामाच्या ठिकाणी, प्रवासात सुरक्षित वाटायला हवे. आर्थिक मोबदल्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव तुझ्या वाट्याला येता कामा नये. अगदी उतरवायतही तुला स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगता यायला हवे. हा माझा संकल्प आहे.
Maharashtra Election 2024: राज्यात आता 8272 उमेदवार रिंगणात, अखेरच्या दिवशी 983 जणांची माघार
या सर्व गोष्टींसाठी मनापासून प्रयत्न करण्याचे निर्धार, हीच माझी तुला ओवाळणी. तिचा स्वीकार कर आणि मगच माझ्या यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना कर, एवढीच विनंती, अशी भावनिक साद शंकर जगताप यांनी आपल्या लाखो बहिणींना घातली आहे.