बिजींग, दि. 14 – चीनचे यानही येत्या शनिवार ते बुधवारच्या दरम्यान मंगळावर उतरण्याच्या तयारीत आहे अशी घोषणा चीनने केली आहे. तियानवेन 1 असे या यानाचे नाव आहे. या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला असून तेथून त्याने बरीच माहिती नियंत्रण कक्षाला पाठवली आहे.
10 फेब्रुवारी रोजीच त्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर बाहेरच्या स्थितीचा अंदाज घेऊन त्यातून रोव्हर पृष्ठभागावर सोडले जाईल.
थेट मंगळाच्या पृष्ठभागावर उतरून तेथे वैज्ञानिक प्रयोग करण्याची चीनच ही पहिलीच वेळ आहे. आत्तापर्यंत केवळ अमेरिकेने नऊ वेळा मंगळाची मोहीम यशस्वी केली आहे. त्यानंतर चीन हा मंगळावर यशस्वी स्वारी करणारा दुसरा देश असेल. चीनने आपली चांद्रयान मोहीमही नुकतीच यशस्वी केली आहे.