चीनच्या सिचुआन प्रांताला भुकंपाचा धक्का; 12 ठार, शंभरावर अधिक लोक जखमी

बिजींग – चीनच्या दक्षिण पश्‍चिमेकडील सिचुआन प्रांताला सोमवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्यात किमान बारा जण ठार झाले तर शंभरावर लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6 रिश्‍टर इतकी होती. त्या प्रांतातील यिबीन शहराला त्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवली. भुकंपाचा केंद्र बिंदु त्याच परिसरात जमीनीखाली 16 किमी इतक्‍या अंतरावर होता.

भूकंपाने अनेक इमारतींना तडे गेले असून अनेक ठिकाणी मोठी पडझडही झाली आहे. नुकसानीचा नेमका अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. या भागात भुकंपाचा इशारा देणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणांनी प्रत्यक्ष भूकंप होण्याच्या काही मिनीटे आधी त्याचा इशाराहीं दिला होता. त्यामुळे अनेकांनी इमारतींबाहेर पडून आपले प्राण वाचवले त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. कोसळलेल्या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास तेथील बचाव यंत्रणांनी प्राधान्य दिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×