वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अवकाशात 28 जानेवारीला दिसलेला चीनचा आणखीन एक टेहळणी बलून आता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सापडत नाही आहे. पहिल्या बलूनला फोडून टाकल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाने या दुसऱ्या बलूनला शोधून फोडून टाकण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र 28 जानेवारीला दिसलेला हा दुसरा बलून कोठे गायब झाला, हे समजू शकलेले नाही. त्याच्याबद्दल आपल्याजवळ कोणतीही माहिती नाही, असे या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना चीनचा टेहळणी बलून तीन वेळा अमेरिकेच्या अवकाशातून घिरट्या घालताना बघितला गेला होता. तर ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात देखील एकदा असा बलून अवकाशात दिसला होता, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.
सर्वात अलिकडे बघितला गेलेला बलून हा 200 फूट उंच आणि त्यामध्ये जवळपास दोन हजार पौंडाची यंत्रसामुग्री होती, असे अमेरिकेच्या उत्तर हवाई हद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विभागाचे प्रमुख एअरफोर्स जनरल ग्लेन व्हॅनहेर्क यांनी म्हटले आहे. यापूर्वीचे बलून कोणत्या भागात बघितले गेले होते, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर
अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानांनी साऊथ कॅरोलिनाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ चीनचा पहिला टेहळणी बलून शनिवारी फोडून टाकला होता. त्यानंतर दुसऱ्या बलूनचा सोध सुरू करण्यात आला आहे.