चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अखेर समुद्रात कोसळलं

रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत?

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोसळलं आहे. हे रॉकेट न्यूझीलंडमध्ये कोसळेल, असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला होता. चीनचं हे भरकटलेलं रॉकेट हिंदी महासागरात कोसळल्याची माहिती वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे.

 

हे रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हे रॉकेट पृथ्वीवर कोसळेल, असा अंदाज होता.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर बहुतांश अंतराळ कचरा हवेतच जळून जातो. क्वचितच असे विशाल तुकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकले आहेत. गेल्यावर्षी अशाचप्रकारे अनियंत्रित स्पेस डेब्रीज लॉस अँजेलिस आणि न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या आकाशातून प्रवास करत अटलांटिक महासागरात पडल्या होते. मात्र, त्यामुळे विशेष नुकसान झाले नव्हते.

अंतराळात सध्या रॉकेटचा मुख्य भाग फिरतो आहे. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब आहे. याचे वजन तब्बल 21 टन आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 असे आहे. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत आहे.

म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत आहे. या रॉकेटची रुंदी 16 फूट असून चीनने त्याला 28 एप्रिल रोजी अंतराळात सोडले होते.

दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने आता नियंत्रणबाह्य चिनी रॉकेट उडवण्याची (शूट डाऊन) योजना नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी माहिती दिली. हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोहोचणार नाही, अशी आशा ऑस्टिन यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.