बीजिंग – चीन आणि हॉंगकॉंग मधील अमेरिकन राजदुतांच्या हालचालींवर चीन सरकारने निर्बंध जारी केले आहेत. अमेरिकेने चीनच्या राजदुतांवर गेल्या वर्षीपासून निर्बंध लागू केले आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून हे निर्बंध घातले गेले असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.
चीनच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. अमेरिकेने आमच्या राजदुतांवरील निर्बंध मागे घेतले तर आम्हीही लगेच हे निर्बंध मागे घेऊ असे चीनने म्हटले आहे.
दोन्ही देशांच्या संबंधांना आड येणाऱ्या ज्या चुका अमेरिकेने केल्या आहेत त्या त्यांनी दुरुस्त करून दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही चीनच्या या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या पत्रकारांवर निर्बंध लागू केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या राजदुतांवर निर्बंध घालण्याकडे वळले आहेत.