“सुई धागा’चा चीनमधील रिलीज लांबणीवर

वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा “सुई धागा- मेड इन इंडिया’ 6 डिसेंबरला चीनमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता तिथे हा सिनेमा रिलीज होणे लांबणीवर पडले आहे. या सिनेमाच्या चीनमधील रिलीजची नवी तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. हॉलिवूड आणि चीनमधील अनेक बिगबजेट सिनेमे 6 डिसेंबरला रिलीज होणार होते. त्यामुळे यशराज फिल्म्सनी “सुई धागा’चा रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मध्यमवर्गीय दाम्पत्याची ही कथा आहे. टेलर आणि एम्ब्रॉयडरी करणाऱ्या दाम्पत्याने मिळून स्वतःचा मोठा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न बघितलेले असते. त्यांच्या संघर्षाची ही कथा म्हणजे देशातील युवा उद्योजकांच्या प्रयत्नांवर टाकलेला हा प्रकाश आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न “सुई धागा’मधून करण्यात आला आहे.

याच वर्षी जून महिन्यात “बेल्ट ऍन्ड रोड फिल्म वीक’ या शांघाय “इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’साठीही “सुई धागा’ची निवड झाली होती. “सुई धागा’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झाला होता. प्रेक्षकांबरोबर विश्‍लेषकांनीही या सिनेमाचे खूप कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.