बीजिंग:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही राष्ट्रांना जी 7 संघटनेत सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तथापि या प्रस्तावाला चीनने विरोध दर्शवला आहे. या संघटनेत चीन विरोधातील लॉबी वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हे प्रयत्न चालवले आहेत असा चीनचा समज आहे; पण आमच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही असे काही करायला जाल तर तुमचे प्रयत्न फसतील असा इशाराही चीनने दिला आहे.
जी 7 हा जगातील अत्यंत पुढारलेल्या श्रीमंत देशांचा गट आहे. त्यात अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या देशांचा समावेश असून या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची दरवर्षीै बैठक होते व ते देश जागतिक अर्थकारणाला दिशा देण्याचे काम करीत असतात.
अध्यक्ष ट्रम्प यांनी आता या गटात भारत, ऑस्ट्रलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही सामावून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याला चीनने प्रखर विरोध दर्शवला आहे. या आधी रशिया या गटात होता पण ओबामा यांच्या काळात रशियाने क्रिमियावर आक्रमण केल्यामुळे त्यांना या संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. आता ब्रिटन आणि कॅनडा या देशांनीही रशियाला पुन्हा या संघटनेत स्थान देण्यास आपला विरोध दर्शवला आहे.