चीनचे नऊ उपग्रह अंतराळात

बीजिंग – चीनने पित समुद्रातील जहाजावरून अंतराळात आज नऊ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. चीनने जहाजावरून अंतरीक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्याचा हा दुसरा प्रकार आहे.

प्रक्षेपणानंतर केवळ 13 मिनिटांमध्ये हे उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत स्थिरावण्यात आले. चॉंगुआंग सॅटेलाईट टेक्‍नॉलॉजी संस्थेने हे उपग्रह विकसित केले आहेत.

कृषी, वन, भूगर्भ संपत्ती इत्यादी क्षेत्रातील निरीक्षणासाठी हे उपग्रह कार्यरत राहतील असे चिनी सूत्रांनी म्हटले आहे. चीनने आपला अंतरीक्ष कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवला असून त्यांनी त्यावर करोना काळाचा किंवा जागतिक अर्थकारणाचा कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.

चीनकडून प्रक्षेपित केले जाणारे अनेक उपग्रह जगातील अन्य देशांच्या हालचाली टिपण्याच्या कामीही वापरले जात आहेत. तथापि त्याचा तपशील मात्र चीनकडून जाहीर केला जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.